Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता येथे डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागा आरक्षित करावी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

राहाता : राहाता शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यासाठी नगर–मनमाड महामार्गालगत आरक्षित जागा उपलब्ध करू

कर्जत तालुक्यात ‘पल्स पोलिओ’ मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज; २२ हजार ९९६ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट
कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादीत होणाऱ्या वस्तू देशभरात पोहचल्या : विवेक कोल्हे
न्यू आर्टस महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन उत्साहात

राहाता : राहाता शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यासाठी नगर–मनमाड महामार्गालगत आरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक वर्षांपासून आंबेडकरी अनुयायांची राहाता शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी आहे. मात्र दरवर्षी १४ एप्रिल किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी व संबंधित अधिकारी स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याचे आश्वासन देतात; प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अनुयायांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.राहाता तालुक्यातील आंबेडकरवादी बांधवांची ही एकमुखी मागणी असून उत्तर अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषदेने ठराव मंजूर करून स्मारकासाठी जागा आरक्षित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित ठिकाणी बौद्ध, दलित तसेच भटके-विमुक्त समाजातील बांधवांना जयंती उत्सव व विविध सामाजिक कार्यक्रम साजरे करता येतील, असेही निवेदनात म्हटले आहे.तसेच स्मारक उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर दीपक कसबे, भारत निकाळे, रावसाहेब बनसोडे, अनुराग निकाळे, सनी खडीझोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

COMMENTS