Homeताज्या बातम्या

शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

गेवराई : उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून शाळा पुन्हा सुरू झाल्याने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा घुमू लागला आहे. तलवाडा

बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ गेवराईत महत्त्वपूर्ण बैठकमतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार
लक्ष्मीच्या पावलांनी झाला शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाचा शुभारंभ

गेवराई : उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून शाळा पुन्हा सुरू झाल्याने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा घुमू लागला आहे. तलवाडा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवीतांडा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

तब्बल दीड महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आपले मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. नवीन पुस्तके, वह्या, रंगीबेरंगी दप्तरे आणि नवीन गणवेश परिधान करून चिमुकले उत्साहाने शाळेत दाखल झाले. शाळेच्या वतीने पहिल्याच दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन तसेच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विशेषतः नवीन प्रवेश घेतलेल्या पहिल्या इयत्तेतील मुलांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची माहिती दिली, तसेच नियमित उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाच्या वतीने आधीच शालेय परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी मुलांच्या किलबिलाटामुळे आणि हास्याने शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला होता. याप्रसंगी शिक्षकांसह पालकांनीही उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला.

COMMENTS