Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केसीआरची ऑफर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी नाकारली

औरंगाबाद/प्रतिनिधी ः तेलंगणाचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव अर्थात केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय रोवू इच

मनपाची 36 वाहने भंगारात; नवीन कार खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित
संजय राऊत यांना मिळालेला जामीन म्हणजे सत्याचा आणि निष्ठेचा विजय
Aurangabad : महिला अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन (Video)

औरंगाबाद/प्रतिनिधी ः तेलंगणाचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव अर्थात केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय रोवू इच्छितांना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षात येण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनचे नेते राजू शेट्टी यांना ऑफर दिली होती. मात्र शेट्टींनी केसीआरची ऑफर नाकारली.

आम्हाला आमची संघटना संपवायची नाही, मी करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नाही, शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी त्यावर लढा देण्यासाठी काम करतो, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. यामुळे आता चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्रात नव्या चेहर्‍याचा शोध घ्यावा लागणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात मराठी चेहर्‍याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी राजू शेट्टी म्हणाले की मी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. तेव्हा चंद्रशेखर राव यांनी आम्ही आता तेलंगणा राष्ट्र समिती राहिले नसून, भारत राष्ट्र समिती झालो आहोत, असे सांगतानाच त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुखपद सांभाळावे अशी विनंती केली होती. मात्र मी त्यांना सांगितले की, तुमची योजना चांगली आहे, भूमिका देखील योग्य आहे. मी केवळ शेतकर्‍यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे असे सांगत ऑफर नाकारल्याचा खुलासा शेट्टींनी केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये सभा घेत महाराष्ट्रात पक्षाचे पायमुळे रोवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजू शेट्टींसह संभाजीराजे छत्रपती यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. तर प्रकाश आंबेडकर हे देखील चंद्रशेखर राव यांच्यासोबत एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केसीआर यांची देशाला ओळख गेल्या दोन वर्षांत झाली आहे.आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मागणीनंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये रावांच्या महत्त्वाकांक्ष मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळताच तिसर्‍या आघाडीचा प्रमुख बनून थेट पंतप्रधानपदाचे उमेदवार किंवा केंद्रीय राजकारणात विरोधकांचा प्रमुख नेता बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशनंतर दुसर्‍या क्रमाकांच्या महाराष्ट्रावर केसीआरची नजर आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांना ते ऑफर देत आहेत.

COMMENTS