कीर्तनकार इंदोरीकर महाराज रस्ते अपघातात किरकोळ जख़मी

Homeताज्या बातम्या

कीर्तनकार इंदोरीकर महाराज रस्ते अपघातात किरकोळ जख़मी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूरजवळ नुकताच अपघात झाला. बुधवारी रा

रयत सेवक बॅंकेस ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्कार
साईनगरीत हार-फुलांच्या विक्रीस सुरवात
गायकरवाडीत ६० वर्षीय व्यक्तीचा खून; अज्ञातांकडून डोक्यावर वार; कर्जत पोलिसांकडून तपास सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूरजवळ नुकताच अपघात झाला. बुधवारी रात्री 8.30 वाजता परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरजवळ ही घटना घडली. दरम्यान, इंदोरीकर महाराज सुखरूप असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असताना परतूरमध्ये रस्ता ओलांडणार्‍या एका ट्रॅक्टरवर इंदोरीकर महाराज यांची कार धडकली. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसर्‍या वाहनाने खांडवीवाडी येथे पोहोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कीर्तन नियोजित वेळेत पार पडले.

COMMENTS