Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीकरांना शिस्त लावण्यासाठी व स्वच्छ शहारासाठी केडीएमसी अ‍ॅक्शन मोडवर

कल्याण प्रतिनिधी - केडीएमसी हद्दीत 122 वार्ड आहेत. यापैकी ज्या ठिकाणी झोपडपट्टी चाळी आहेत, त्या ठिकाणी घंटागाडी पोहचत नाही असं आढळून आलं. पालिके

उच्चभ्रू शेतकरी जातींच्या मग्रुरीला नरेंद्र मोदी यांनी ठेचून काढले! 
शेतकरी आत्महत्या करून चीतेवर जातोय
तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना

कल्याण प्रतिनिधी – केडीएमसी हद्दीत 122 वार्ड आहेत. यापैकी ज्या ठिकाणी झोपडपट्टी चाळी आहेत, त्या ठिकाणी घंटागाडी पोहचत नाही असं आढळून आलं. पालिकेने सर्व वॉर्डचा सर्व्हे केला असून सुमारे 91 हजार प्रॉपर्टी अशा आहेत की तिथे घंटागाडी पोहचत नाही. आता अशा ठिकाणी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी 200 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत. मार्शल टेंडरही अंतिम टप्पात आले असून नियुक्त केले मार्शल कल्याण डोंबिवलीकरांना शिस्त लावण्याचे काम करणार आहे. उघड्यावर नागरिकांनी कचरा टाकल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच जे दुकानदार ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी कचराकुंड्या ठेवणार नाही किंवा त्यांच्या दुकानासमोर कचरा टाकलेला आढळल्यास त्यांच्यावरही मार्शलद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापारी संघटना व इतर नागरिकांनी सहकार्य करावे अस आवाहन घनकचरा विभागाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नावाने बोटं मोडणारे नागरिक उघड्यावर कचरा न टाकता पालिकेला सहकार्य करतात का? ते देखील पाहावं लागणार आहे.

COMMENTS