Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

कर्जत : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मिरजगाव येथे खजूर पाकिटांचे वाटप करून सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

 कर्जतचे उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांचा राजीनामा
नेहरू विद्यालयाला साऊंड सिस्टिम भेट
कोपरगावमध्ये जप्त वाहनांचा जाहीर लिलाव २३ मार्चला

कर्जत : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मिरजगाव येथे खजूर पाकिटांचे वाटप करून सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. दीपक  गांगर्डे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी सचिन दरेकर, नितीन उदमले दादा तनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी सरपंच दीपक गांगर्डे म्हणाले की,रमजान हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) पाळून नमाज पठण करत अल्लाहची उपासना करतात. रोजा सोडताना खजूर खाण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने रमजानच्या निमित्ताने खजूर वाटपाचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दोन्ही समाजामध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा. या देशामध्ये विविध जाती धर्म पंथ यांचे सर्व नागरिक आजही मोठ्या आनंदाने आणि एकोप्याने एक देश म्हणून राहतात. दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने मुस्लिम बांधव सहभागी होतात अशच पद्धतीने रमजानच्या पवित्र सणांमध्ये देखील मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी होण्याची ही परंपरा आहे. आणि एक ते मध्येच या देशाची खरी ताकद आहे शक्ती आहे. असे दीपक गांगर्डे यावेळी म्हणाले.

समाजात बंधुभाव, परस्पर आदर आणि ऐक्य टिकून राहावे, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आपल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र सणात सहभागी होण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. हिंदू-मुस्लिम ऐक्य जपणारा हा उपक्रम समाजात सलोखा आणि बंधुभाव वाढविणारा ठरत असून दीपक  गांगर्डे यांच्या सामाजिक बांधिलकीची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली.

COMMENTS