Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांची तब्बेत बिघडली

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, म

शिवराज्याभिषेकासाठी मुस्लिम तरुणाने आणले गंगाजल
ढाकणी येथे अज्ञात बोलेरोच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू
महात्मा फुले  : व्यवस्थेला भिडून बदल घडवणारा महामानव!

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, मंगळवार दोन दिवस शरद पवार हे विदर्भ दौर्‍यावर होते. मात्र शरद पवारांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. पवारांची तब्येत बिघडल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना चार दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्ष बांधण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशावेळी शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढील चार दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

COMMENTS