Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी

पुणे ः कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांन

तेरामैल अपघात; आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | LOKNews24
आधारचा गैरवापर केल्यास होऊ शकतो एक कोटींचा दंड
गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार

पुणे ः कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा-कोरेगाव येथे दाखल होत भल्यापहाटे विजयस्तंभाला अभिवादन केले. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचं प्रतिक आहे.  दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी 1 जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होतात.
यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शौर्यदिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीमसैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव-भीमा परिसरात दाखल झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील ठेवला आहे. पोलिसांसह आरोग्य सेवा, वाहतूक, पार्किंग, शौचालय अशा सर्व सुखसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मदतीसाठी 3200 पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह 700 होम गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. शिवाय आरोग्य सेवेसाठी 29 ठिकाणी आरोग्य कक्ष, 50 रुग्णवाहिका, 90 तज्ज्ञ डॉक्टर 200 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असणारा विजयस्तंभ 75 फूट उंच आहे. त्यासाठी चारही बाजूंनी क्रेनच्या साहाय्याने साडे चार टन वजनाच्या विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.

COMMENTS