Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय हनुमान संस्थानच्या महंतपदी केशव शास्त्री

खरवंडी कासार : राणेगाव येथील जय हनुमान संस्थानच्या महंतपदी ह.भ.प. केशव महाराज शास्त्री भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राणेगाव ग्रामस्थांच्या विनंतीनुसार व महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. या नियुक्तीमुळे राणेगावसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून महाराजांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केशव महाराज शास्त्री हे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट संचलित ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे विद्यार्थी असून महंत  नामदेव महाराज शास्त्री यांचे शिष्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावली असून त्याच कार्याची दखल घेत त्यांच्यावर महंतपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी बोलताना  महंत केशव महाराज शास्त्री यांनी, माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत संस्थानच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत समाजसेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  कार्यक्रमात बोलताना महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी, भगवानगडाचा प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानरूपी मोगऱ्याच्या कळीप्रमाणे असून ज्ञानेश्वरी विद्यापीठात त्यांचे सुंदर फुलात रूपांतर होते आणि त्या ज्ञानाचा सुगंध आज महाराष्ट्रभर पसरत असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमास श्री क्षेत्र भगवानगडाचे प्रधानाचार्य ह.भ.प. नारायण महाराज शास्त्री, महंत भगवान महाराज शास्त्री, महंत नवनाथ महाराज शास्त्री, महंत अतुल महाराज शास्त्री, महंत हनुमंत महाराज शास्त्री, महंत संतोष महाराज शास्त्री, महंत गणेश महाराज शास्त्री यांच्यासह भगवानगडावरील साधक मंडळी उपस्थित होती. तसेच राणेगाव व परिसरातील शेकडो भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

भगवान गडाच्या नारळी सप्ताहासाठी विशेष बस सेवा
भगवानगड परिसरात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  
जवळवाडीत यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचा हंगामा

खरवंडी कासार : राणेगाव येथील जय हनुमान संस्थानच्या महंतपदी ह.भ.प. केशव महाराज शास्त्री भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राणेगाव ग्रामस्थांच्या विनंतीनुसार व महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. या नियुक्तीमुळे राणेगावसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून महाराजांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

केशव महाराज शास्त्री हे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट संचलित ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे विद्यार्थी असून महंत  नामदेव महाराज शास्त्री यांचे शिष्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावली असून त्याच कार्याची दखल घेत त्यांच्यावर महंतपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यावेळी बोलताना  महंत केशव महाराज शास्त्री यांनी, माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत संस्थानच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत समाजसेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमात बोलताना महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी, भगवानगडाचा प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानरूपी मोगऱ्याच्या कळीप्रमाणे असून ज्ञानेश्वरी विद्यापीठात त्यांचे सुंदर फुलात रूपांतर होते आणि त्या ज्ञानाचा सुगंध आज महाराष्ट्रभर पसरत असल्याचे सांगितले.

 या कार्यक्रमास श्री क्षेत्र भगवानगडाचे प्रधानाचार्य ह.भ.प. नारायण महाराज शास्त्री, महंत भगवान महाराज शास्त्री, महंत नवनाथ महाराज शास्त्री, महंत अतुल महाराज शास्त्री, महंत हनुमंत महाराज शास्त्री, महंत संतोष महाराज शास्त्री, महंत गणेश महाराज शास्त्री यांच्यासह भगवानगडावरील साधक मंडळी उपस्थित होती. तसेच राणेगाव व परिसरातील शेकडो भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

COMMENTS