Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव भीमात बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

शिक्रापूर / प्रतिनिधी कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये 21 मे रोजी काही मुले पोहण्यासाठी गेले असताना दोन मुले पाण्यात बुडाल्

LokNews24 l महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य
महावितरणने ठेकेदारांची बिले थकवल्याने 20 फेब्रुवारीपासून ठेकेदारांचा बंदचा इशारा

शिक्रापूर / प्रतिनिधी कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये 21 मे रोजी काही मुले पोहण्यासाठी गेले असताना दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना घडली असताना दिवसभर मुलांना पाण्यात शोधण्यात पोलीस व पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाच्या जवानांना अपयश आले असता अखेर आज दुपारच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या अनुराग विजय मांदळे व गौरव गुरुलिंग स्वामी या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये 21 मे रोजी सकाळच्या सुमारास काही मुले पोहण्यासाठी गेलेले असताना दुपारी अनुराग मांदळे व गौरव स्वामी हि दोन्ही मुळे पाण्यात बुडाली होती, त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाच्या जवानांनी मुलांचा पाण्यात शोध घेतला होता मात्र मुळे पाण्यात मिळून आलेली नसताना अखेर आज सकाळपासून पुन्हा पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्नीशमक दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार पाटील, प्रकाश मदने, विकास पालवे, उमेश फाळके, सुरज इंगवले, संदीप तांबे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अशोक केदार यांनी पुन्हा पाण्यात शोधकार्य सुरु केले असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गौरव स्वामी तर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अनुराग मांदळे या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, सदर दुर्घटनेत अनुराग विजय मांदळे वय 16 वर्षे व गौरव गुरुलिंग स्वामी वय 16 वर्षे दोघे रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे या दोघांचा मृत्यू झाला असून दोघे देखील आई वडिलांची एकुलती एक मुले असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याबाबत वैजनाथ बाबुराव स्वामी वय 42 रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

COMMENTS