बीड : तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्

बीड : तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते, तर प्रमुख उपस्थितीत दामोदर थोरात, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ आणि बाळकृष्ण मुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, लोकनाट्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे हे वंचितांच्या वेदना प्रभावीपणे मांडणारे थोर साहित्यिक होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
सार्वजनिक उत्सव समिती गठित
याप्रसंगी अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समिती गठित करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी दादा थोरात, उपाध्यक्षपदी बालू थोरात, सचिवपदी अजित थोरात, कोषाध्यक्षपदी रमेश थोरात आणि सल्लागारपदी धीरज थोरात यांची निवड झाली. तसेच समिती सदस्य म्हणून औदुंबर थोरात, बापू थोरात, अजय थोरात, उमेश थोरात, अशोक थोरात, भालचंद्र कुदळे, पप्पू निर्मळ, राजेंद्र थोरात, पप्पू कांबळे आदींची निवड करण्यात आली.
निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बालासाहेब जाधव यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक ऐक्य व समतेची भावना जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला.

COMMENTS