दृष्टी नसलेले मोदी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

दृष्टी नसलेले मोदी

बुद्धपौर्णिमेनिमित्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेदहा वाजता नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचले. आम्ही जगाला बुद्ध दिला असे मोदी म्हणत असतात.

राज्यात गुुंडांचा उच्छाद
चांद्रयानमुळे अवकाश खुले
आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा

बुद्धपौर्णिमेनिमित्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेदहा वाजता नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचले. आम्ही जगाला बुद्ध दिला असे मोदी म्हणत असतात. पण आम्ही  बुद्ध स्वीकारला असे मोदी कधीही म्हणत नाहीत. त्यांनी नेपाळमध्ये भारताच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केली. आता पायाभरणी हा प्रकार बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. तरीही मोदींनी तसे करणे हे एकतर जाणीवपूर्वक केलेले असावे किंवा मोदींना बुद्ध तत्वज्ञान माहित नाही असे ते असावे. या केंद्रात बौद्ध परंपरेवर अभ्यास केला जाणार आहे. तत्पूर्वी, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी हेलिपॅडवर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले ते ठीकच. दोन्ही पंतप्रधानांनी मायादेवी मंदिरात पूजा केली. मंदिराची पूजा करणे हा ज्याचा त्याचा अधिकार. त्यानंतर त्यांनी पुष्करणी तलावाची प्रदक्षिणा केली. आता या प्रदक्षिणेतून मोदींना काय साध्य करायचे होते हे कळत नाही. ज्या अर्थाने मोदींनी ही प्रदक्षणा घातली त्या अर्थाने मोदींनी नेपाळ दौरा हा पुष्पक विमानाने करायला हवा होता. किंवा एखाद्या जटायू पक्ष्याच्या पाठीवर बसून जायला हवे होते. मोदींनी असे काहीच केले नाही. उलट ते माणसांनी तयार केलेल्या विमान आणि ह्यालिकॉप्टर मधून नेपाळला पोहचले. मोदी यांनी तेथे ‘पवित्र’ बोधिवृक्षाची पूजाही केली. हा निव्वळ गैबांदासपणा. बुद्ध तत्वज्ञानात पवित्र आणि अपवित्र याला स्थान नाही. हे कळायला अक्कल लागते. बोधीवृक्षाची पूजा ही जर श्रद्धेच्या भावनेतून मोदींनी केली असेल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा असते. म्हणजेच मोदी हे अंध आहेत का? हा प्रश्न. जर याचे उत्तर सकारात्मक असेल तर हे असले लोक विकृत मानसिकतेचे असतात हे सत्य. गौतम बुद्धाचा विकृत डोक्यातल्या तत्वज्ञानाला, असत्याला, अज्ञानाला होता. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे, चिंतनाचे केंद्र माणूस आहे. म्हणूनच गौतम बुद्धाचे तत्वज्ञान माणूसकेंद्रीत आहे हे मोदींना कळत नाही असे अजिबात नाही. बुद्धाला देव करण्याचा हा प्रकार आहे. पण भारतात मोदीच काय अशा १३० कोटी मोदींनी जरी बुद्धाला देव करायचे ठरवले तरी ते शक्य नाही. बुद्धाचे तत्वज्ञान आता सर्व जगाला कळालेले आहे पण जे दाढी वाढवतात ना, त्यांना कळालेले नाही आणि कळणारही नाही. खरेतर मोदींनी तिथे प्रदक्षिणा घालतांना उघडे होऊन अंगा- तोंडाला राख लावून प्रदक्षणा घातली पाहिजे होती. कारण आपल्याकडे तशा परंपरा आहेत. असो, सत्य शोधणारा बुद्ध हा जगातील पहिला शास्त्रज्ञ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैज्ञानिक सत्यावर आधारीत बुध्द धम्माची पुनर्रचना केली आणि जगमान्य झाले. बुद्ध हा जगाचा पहिला तत्वज्ञानी आहे. बुद्ध तत्वज्ञान हे जगाच्या पाठीवरचे पहिले इहवादी, समतेचे, न्यायाचे, बंधुतेचे तत्वज्ञान आहे. प्रतित्यसमुत्पाद हा बुद्ध तत्वज्ञानाचा पाया आहे. बुद्ध कल्पनाविलासी नव्हता तर वास्तववादी होता. मानवी जीवनात उत्कट असा समतोल निर्माण झाला पाहिजे हे धम्माचे ब्रीद आहे. बुद्ध तत्वज्ञान माणसाला सुंदर करणारे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान समतेचे, बंधुत्वाचे, स्वातंत्र्याचे तत्वज्ञान आहे, एवढे मोदीला कळाले तरी केस पांढरे झाल्याचे सार्थक होईल. पण मोदींनी आज जे नेपाळमध्ये केले त्यावरून मोदी हे अंध आहेत किंबहुना त्यांच्या डोळ्यात श्रद्धेची धूळ गेलेली आहे. म्हणून त्यांना बुद्ध स्पष्ट दिसत नाही. दृष्टी नसलेले मोदी आपल्या देशाचे काय भले करणार? 

COMMENTS