Homeताज्या बातम्या

शेतकऱ्याच्या पीक प्रयोगांचे कृषी विस्तार सहसंचालकांकडून कौतुक  

अकोले : राज्याचे कृषी विस्तार सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी कोतुळ येथील कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित शेतकरी सयाजीराव पोखरकर यांच्या शेतीला भे

 कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार  
सह्याद्री उजळला काजव्यांच्या मायावी प्रकाशाने! अकोलेतील ‘काजवा महोत्सवा’ला पर्यटकांची झुंबड; निसर्गाचा अद्भुत सोहळा
शाळेतील मैत्रीने उभी केली सामाजिक मदतीची भक्कम भिंत‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’च्या वतीने 30 हजार रुपयांची मदत


अकोले : राज्याचे कृषी विस्तार सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी कोतुळ येथील कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित शेतकरी सयाजीराव पोखरकर यांच्या शेतीला भेट देऊन विविध कृषी प्रयोगांची पाहणी केली. प्रतिकूल परिस्थितीतही पोखरकर बंधूंनी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कोतुळ आणि परिसरातील शेतकरी सुरुवातीपासूनच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. कारली, कोबी, वालवड, टोमॅटो, झेंडू, आले तसेच ऊस या पिकांच्या लागवडीतील विविध प्रयोग या भागातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर, ठिबक व तुषार सिंचन, आच्छादनासाठी प्लास्टिकऐवजी पिकांच्या अवशेषांचा वापर, रुंद सरी पद्धत, कंपोस्ट खत निर्मिती, गांडूळ खत प्रकल्प, दशपर्णी अर्काचा वापर तसेच बांधावरील सघन आंबा लागवड आदी प्रयोगांची जेजुरकर यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध पिकांवरील हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोतुळ परिसरातील काळे फार्म येथे राबविण्यात येणाऱ्या प्रकाश सापळ्यांच्या पथदर्शी प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली. भुंगेरे गोळा करून हुमणी नियंत्रणासाठी करण्यात येणारे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संगमनेर येथील उपविभागीय कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी किरण विरकर, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, मंडळ कृषी अधिकारी नारायण घुले, उपकृषी अधिकारी राजाराम साबळे, लक्ष्मण पवार, अनिल फापाळे, सहाय्यक कृषी अधिकारी सुनीता फटांगरे, सहाय्यक कृषी अधिकारी दातीर, कृषिभूषण किसनराव पोखरकर, संजय पोखरकर, भाऊसाहेब पोखरकर, आदित्य पोखरकर, मोहन साबळे, पत्रकार संजय फुलसुंदर तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS