भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!

स्वातंत्र्य चळवळीचा सर्वात मोठा इतिहास असणारी काँग्रेस, आता देशभरात जवळपास रसातळाला गेली आहे. काँग्रेसचा मुख्य प्रश्न हा नेतृत्वाचा आहे. राहुल गांधी

इंधन दरवाढ कपातीचे गौडबंगाल !
इराणीं’चे अज्ञान की असंवेदनशीलता ? 
आंबेडकर, मायावती, ओवैसी यांची वेगळी वाट त्यांनाच नुकसानदायक ! 

स्वातंत्र्य चळवळीचा सर्वात मोठा इतिहास असणारी काँग्रेस, आता देशभरात जवळपास रसातळाला गेली आहे. काँग्रेसचा मुख्य प्रश्न हा नेतृत्वाचा आहे. राहुल गांधी यांना अनेक वेळा काँग्रेसने लॉन्च केल्यानंतरही पक्षाच्या शक्तीत कोणताही फरक पडलेला नाही. याउलट काँग्रेस देशभरात सर्वच राज्यात आता कमजोर होत चालली असून काँग्रेसच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  काँग्रेसची भारत जोडो यात्रा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाचे सुतोवाच करण्याची भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किंवा जी – २३ मधील नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नसतानाही, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याची भूमिका म्हणजे काँग्रेसला रसातळाकडे नेण्याचे प्रकार असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. महाराष्ट्रात देखील काँग्रेसचे जवळपास नऊ आमदार हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची सार्वत्रिक चर्चा आता सुरू झाली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत जात असली तरी ते यात्रेची नियोजन अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्याचे उघड झाले आहे. भारत जोडो ही यात्रा कोणत्याही राज्याच्या मध्यवर्ती भागातून जात नसून प्रत्येक राज्याच्या सीमावरती भागातून ही यात्रा जात असल्याने या यात्रेचा प्रभाव कोणत्याही राज्यावर पडणार नसल्याचेच हे द्योतक आहे, असे आता म्हटले जाते. अर्थात, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे नियोजन हे काँग्रेसच्याच लोकांनी केले आहे; ज्यात जी-२३ लोकांचा समावेश नाही! तरीही, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, ही देशाच्या कोणत्याही राज्याच्या मध्यवर्ती भागातून न जाऊ देण्याचे हे एकंदरीत कारस्थान असून, याचाच अर्थ राहुल गांधी यांचे नेतृत्व आता काँग्रेस मधील दुसऱ्या फळीलाही नको आहे! एकंदरीत काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेर नेतृत्व देण्याशिवाय आता अत्यंत राहणार नाही, असाच प्रकार या सर्व बाबीतून दिसतो आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी गुलाम नबी आझाद यांनी पक्ष स्थापन करण्याची भूमिका घेतल्यामुळे जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये काँग्रेसची होती ती ही शक्ती जवळपास आता संपल्याच्या मार्गावर आहे उत्तर भारताचा केवळ राजस्थान सोडला तर कोणत्याही राज्यात काँग्रेसचे म्हणावे असे आता अस्तित्व उरलेले नाही. नाही म्हणायला मध्य प्रदेशात काही काळ त्यांची सत्ता होती. परंतु, मध्यप्रदेशातील नव्या नेतृत्वानेच काँग्रेसला आव्हान दिल्यामुळे तेथील शक्तीही आता मर्यादित झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाची लढाई करते आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर काँग्रेसला आपले अस्तित्व वाचविण्याचाच प्रश्न मोठा असताना सत्ता बदलाकडे जाण्याची त्यांची आता कुवत राहिलेली नाही, हे देशाच्या समोर स्पष्ट झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपली शक्ती पूर्णपणे आत्ताच उभी केल्याचे दिसत आहे. काँग्रेस या रणनीतीत कुठेही दिसत नाही. याचाच अर्थ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका तर सोडाच, परंतु, नेतृत्व कोणाकडे असेल हा देखील प्रश्न अजून निकाली निघालेला नाही! अशा परिस्थितीत राहुल गांधी हे पुन्हा अध्यक्ष होतात की नाही याचीच खात्री नसताना, गांधी कुटुंबाच्या बाहेर पक्ष नेतृत्व दिले तर त्यातूनही काँग्रेस अंतर्गत बंडाळी होणारच. कारण काँग्रेसच्या नेतृत्वासाठी अनेकांची अपेक्षा असून त्यात नेमके कोणाला यासाठी नियुक्त केले जाईल हे अजून सांगणे कठीण आहे. अर्थात, काँग्रेसने यासाठी निवडणूकिचा फार्स निश्चितपणे पुढे आणलेला आहे; परंतु, वस्तुस्थिती ही निवडणूकीपेक्षा नियुक्तीचीच अधिक असणार आहे, हे सांगण्यासाठी फार मोठ्या तज्ञाची आवश्यकता नाही. ही सर्व परिस्थिती पाहता काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही राजकीय पक्ष उभारणीसाठी किंवा संघटनात्मक बांधणीसाठी नसून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची  लॉन्चिंग करण्याची नीती आहे, जी अपयशाचे गमक ठरेल, हेच आता स्पष्ट दिसते

COMMENTS