Homeताज्या बातम्या

बेलापूरातील संत सावता महाराज सप्ताहाची सांगता

बेलापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे आयोजित सप्ताहाची सांगता शोभायात्रा, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने झाल

पंढरीच्या वारीत ‘के. जे. सोमैया’च्या स्वयंसेवकांचा उल्लेखनीय सहभाग; कोपरगाव महाविद्यालयात सन्मान
गावठी कट्टा बाळगणार्‍याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कर्जतमध्ये सराफाला भरदिवसा लुटले; दोन महिलांनी चांदीचे दागिने केले लंपास

बेलापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे आयोजित सप्ताहाची सांगता शोभायात्रा, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने झाली. यावेळी जीवनगौरव व समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच कलश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातून त्यांच्या प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भाविक, महिला तसेच संत सावता महाराज मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सप्ताहाच्या कालावधीत ह. भ. प. मयूर बाजारे, डॉ. शुभम कांडेकर, विजय महाराज कुहिले, विश्वंभर महाराज शिंदे, बाबानंद महाराज, मोहन महाराज बेलापूरकर आदींनी कीर्तनसेवा केली. संत सावता महाराज मंदिरात ह. भ. प. स्वामी रामानंद पुरी यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर स्व. गणपतराव टेकाडे व स्व. विलासनाना मेहेत्रे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह. भ. प. संजय शिरसाठ व त्यांच्या कुटुंबीयांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शोभायात्रेनिमित्त आयोजित कलश सजावट स्पर्धेत सुनीता साळुंके यांनी प्रथम, तृप्ती छल्लारे यांनी द्वितीय, स्वानंदी खजिनदार यांनी तृतीय, तर मंगला महाले यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. सविता मेहेत्रे, पूर्णा कणसे, श्रुती छल्लारे, श्रेया भडके, अनुसया माळी, वृषाली दाभाडे, राधिका दुधाळ, शौर्या कुऱ्हे, श्रावणी अग्रवाल, ओवी मेहेत्रे, उषा जाधव, विद्या मेहेत्रे आदींना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

COMMENTS