Homeताज्या बातम्या

जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार; आमदार मोनिका राजळे यांच्याकडून कामाची पाहणी

पाथर्डी : शेवगाव व पाथर्डी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या दोन्हीही योजना पूर्ण क्

तनपुरवाडी येथील नदीचे लोकवर्गणीतून खोलीकरण; सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  
साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड

पाथर्डी : शेवगाव व पाथर्डी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या दोन्हीही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला. गुरुवारी या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जायकवाडी येथे जात आमदार राजळे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच योजनेत येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, नगरसेवक नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, डॉ. मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, प्रतीक खेडकर, अमोल गर्जे, डॉ. जगदीश मुने, प्रतीक नांगरे, अजय भंडारी, संजय भागवत, संजय देशमुख, सुभाष बोरुडे, अजिनाथ मोरे, धनंजय चितळे, मनीषा उदमले, वंदना टेके, ज्योती शर्मा, पाथर्डी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे आणि शेवगावच्या मुख्याधिकारी विजया घाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, शेवगाव व पाथर्डी शहराचा वेगाने विस्तार होत असून दोन्ही शहरांतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे. ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. सध्या पाथर्डी योजनेच्या जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यांत जॅकवेलला जोडल्या जाणाऱ्या पाइपलाइनचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्यास फ्लोटिंग पंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

शेवगाव शहरातील पाइपलाइनचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी पाथर्डी शहरातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. सध्या शेवगाव शहराला दैनंदिन ९० लाख तर पाथर्डी शहराला ६३ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. मात्र, सध्या या प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. शेवगाव योजने संदर्भात राज्य व केंद्र शासनाकडून काही परवानग्या घेणे बाकी असून त्या लवकरच मिळतील. या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास राजळे यांनी शेवटी व्यक्त केला.

COMMENTS