Homeताज्या बातम्या

पेपरफुटी विधेयकावरून राज्यसभेत खरगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक २०२६ मांडले. लो

घुले प्रकरण: घटनेदिवशी मी अन् गाडीही घरीच! सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी
मेंढपाळांसाठी चराई क्षेत्र अन् गुन्हे मागे घेण्याबाबत धोरण ठरणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
नांदेड शहरातील डी-मार्ट रोडवरील झाडांची विनापरवाना कत्तल? जाहिरात फलकांसाठी हरित संपदेवर घाला; कारवाईची मागणी
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने जाति जनगणना पर प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी को लिखा पत्र, भाजपा ने लगाया आरोप | आकाशवाणी न्यूज़

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक २०२६ मांडले. लोकसभेत काल आवाजी मतदानाने मंजूर झालेल्या या विधेयकावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरावरून खरगे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली.

‘पेपर चोरणारे वाचले, मेहनत करणारे मार खात राहिले’

संसदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “पेपर चोरणारे वाचले आणि प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी मार खात राहिले, हा कसला न्याय?” पेपर लीकमुळे कित्येक निर्दोष विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून लाखो आई-वडील, महिला आणि तरुण त्रस्त आहेत. सरकारने आणलेल्या या नवीन विधेयकात केवळ आकडेवारी बदलली असून त्यातून मूळ प्रश्न सुटणार नाही. जादा दंड, कठोर शिक्षा किंवा फास्ट ट्रॅक कोर्टाचा उल्लेख करून काहीही फरक पडणार नाही; सरकारने पेपरफुटी नक्की कशी रोखणार हे स्पष्ट करायला हवे होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खुर्ची वाचवण्यासाठी प्रधानांचा राजीनामा घेतला

देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवल्यानंतर, विरोधी पक्षांनी हा मुद्दा रस्त्यापासून संसदेपर्यंत ताकदीने लावून धरला. सरकारवर दबाव वाढल्याने अखेर त्यांना विद्यार्थ्यांच्या संघर्षापुढे झुकावे लागले. “आपली खुर्ची जाईल या भीतीने सरकारने विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी हे विधेयक आणले असून, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठीच प्रधानांचा राजीनामा घेतला गेला,” असा घणाघाती आरोप खरगे यांनी केला.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्लीत २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा पाढा वाचताना खरगे अत्यंत आक्रमक झाले. ते म्हणाले की, “गावागावातून संवादासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधूर, वॉटर कॅनन आणि थेट पॅलेट गनचा वापर करण्यात आला. इंटरनेट बंद करून विद्यार्थ्यांना डांबण्यात आले, ज्यामध्ये १०० हून अधिक तरुण जखमी झाले आहेत. कोणाचा डोळा गेला, तर कोणाचा हात-पाय तुटला. या सर्व अत्याचाराला गृहमंत्री अमित शाहच जबाबदार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.” गृहमंत्री अमित शाह या गंभीर मुद्द्यावर शांत का आहेत, असा प्रश्न विचारत बंद खोलीत राहणाऱ्या सरकारला आम्ही खेचून बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS