Homeताज्या बातम्या

बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बीड येथे ‘अभंग वाणी’ भक्ती संगीताचे आयोजन

बीड: बालरंगभूमी परिषद आणि सौ. के. एस. के. महाविद्यालयाचा संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त 'अभंग वाणी' या भक्ती संगीताच्य

बीडमध्ये आरक्षण वर्गीकरणावर परिसंवादाचे आयोजन; ५ जुलै रोजी सामाजिक न्याय भवनात होणार चर्चा
भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलच्या राज्य उपाध्यक्षांसह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते सोहळा
तंत्रशिक्षणात नवे पर्व; एआय आणि उद्योग अनुभवातून शिक्षक घडविण्याचा एमएसबीटीईचा संकल्प
Sau KSK (Kaku)College Of Food Technology in Shivaji Chowk,Beed - Best  Agricultural Colleges near me in Beed - Justdial

बीड: बालरंगभूमी परिषद आणि सौ. के. एस. के. महाविद्यालयाचा संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘अभंग वाणी’ या भक्ती संगीताच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी दिली आहे.

गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सौ. के. एस. के. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी १०.०० वाजता हा भक्तिमय अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात लहान बालगोपाळांतर्फे विविध भक्तीगीते व अभंग सादर केले जाणार आहेत.

या भक्तिमय कार्यक्रमास नागरिक व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, व्ही. टी. देशमाने, स्नेहलता पाठक, अनुराधा चिंचोलकर, अनिता शिंदे, नामदेव साळुंके, संगीत विभागाचे प्राध्यापक महेश दाडगे, मिलिंद शिवणीकर, दुष्यंत रामटेके, सुरेश थोरात, इंद्रजीत भांगे, अमित गाडे, बाबासाहेब कांबळे, सिद्धार्थ अग्रवाल, प्रियंका देशमाने, असलम युनूस आणि सुरेश साळुंके यांनी केले आहे.

COMMENTS