बीड : सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती यंदा शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण शुद्ध नवमी या तिथीनुसार उत्साह

बीड : सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती यंदा शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण शुद्ध नवमी या तिथीनुसार उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी शुभम नागनाथ टाक, उपाध्यक्षपदी विनोद रामदास दहिवाळ तर सचिवपदी अनिल भिमराव बागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक तथा प्रणेते अॅड. संदीप बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक तथा बीड सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रवीशेठ मानूरकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री दत्त मंदिर येथे नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गणेशराव नांदेवालीकर, शशिकांत शहाणे, सतीश महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत जयंती महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष शुभम नागनाथ टाक, उपाध्यक्ष विनोद रामदास दहिवाळ, सचिव अनिल भिमराव बागडे, कोषाध्यक्ष अक्षय रमेश बुरांडे, कार्याध्यक्ष वैभव हिम्मतराव बेदरे आणि संघटक निलेश नरेंद्र करमाळकर यांची निवड करण्यात आली. जयंती महोत्सवानिमित्त भव्य रॅली तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीस संकेत बेदरे, पुष्कराज बेदरे, ओम करमाळकर, स्वस्तिक अंबिलवादे, सौरभ बेदरे, अरुण लोळगे, प्रणव कुलथे, राजू शहाणे, बाळू बेदरे, आर्यन जोजारे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, कैलास वडगावकर, विनोद अष्टेकर, विशाल करमाळकर, अनिल टाक, राजू कुलथे, स्वयम पंडित, मुन्नाशेठ दहिवाळ, विशाल जोजारे, मनोज दहिवाळ, अतुल बागडे, राजेश अडाणे, सतीश कुलथे, लक्ष्मण बेदरे, गणेश जोजारे, रोहन बेदरे, कार्तिक टाक, अनिल महामुनी, दत्तात्रय सोनार, सोनल करमाळकर, कृष्णा शहाणे, शशिकांत शहाणे, तन्मय पंडित यांच्यासह सोनार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS