Homeताज्या बातम्या

‘रयत’च्या उत्तर विभाग अध्यक्षपदी आ. रोहित पवार; कर्जतमध्ये भव्य नागरी सत्कार

कर्जत : रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्

मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला
अहिल्यादेवींच्या जयंतीपूर्वी चोंडी मार्गाची दुरुस्ती करा; रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांची मागणी
काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांचा कर्जतमध्ये नागरी सत्कार

कर्जत : रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्जत तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर रयत संकुल कर्जत तालुका आणि माजी विद्यार्थी संघ, दादा पाटील महाविद्यालय (कर्जत) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. प्रास्ताविक करताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. रयतेचा शैक्षणिक रथ पुढे नेताना नव्या पिढीचे नेतृत्व रोहितदादांसारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीकडे जाणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले, “शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी रयत शिक्षण संस्था हे प्रभावी माध्यम आहे. आगामी काळात सर्व शैक्षणिक संकुलांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. पालकांची स्वप्ने विद्यार्थ्यांच्या यशातून पूर्ण होतात, त्यामुळे दूरदृष्टी ठेवून काम करणे आवश्यक आहे.”

या भव्य सत्कार समारंभासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, नामदेव राऊत, बाळासाहेब शिंदे, प्रा. किरण पाटील, किरण नाना पाटील, आबासाहेब डमरे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS