Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईत डॉक्टरांनी केले रक्तदान, आ.नमिता मुंदडांनी केले कौतुक

अंबाजोगाई प्रतिनिधी - वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या डॉक्टरांनी पुढाकार घेवुन रक्तदान शिबीर घेणे असं उदाहरण कधी ऐकायला येत नाही. पण अंबाजोगाईच्

ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव
सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?
Buldhana : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप चिघळला (Video)

अंबाजोगाई प्रतिनिधी – वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या डॉक्टरांनी पुढाकार घेवुन रक्तदान शिबीर घेणे असं उदाहरण कधी ऐकायला येत नाही. पण अंबाजोगाईच्या खासगी प्रॅक्टीस करणार्या डॉक्टरांनी या क्षेत्रात इतिहास घडवला असुन डॉक्टर डे निमित्त विविध सामाजिक संघटना तथा या मंडळींनी एकत्रित येवुन घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केज विधानसभेच्या आ.सौ.नमिता मुंदडा यांनी केले. स्वत: आमदारांनी औचित्य साधुन डॉक्टरांच्याकडे जावुन गुलाबपुष्प देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
धन्वंतरीच्या दरबारात काम करणारी ही मंडळी ज्यांच्या अंगी सामाजिक संवेदना आणि मानवता असते यातुन स्पष्ट झालं. डॉ.भुतडा यांच्या रूग्णालयाचा 5वा वर्धापन दिन आणि डॉक्टर्स डे निमित्त आयएमए संघटना, रोटरी क्लब, आदींच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होतं. या शहरात समाजात अनेक असे आदर्श निर्माण करण्याची परंपरा पुर्वांपार चालु त्यापैकीच एक. कारण डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेवुन रक्तदान शिबीर घेतलं. ते केवळ डॉक्टरांचं. असं उदाहरण पहायला कधी मिळत नाही. पण चार मंडळी चांगल्या विचाराची एकत्र येवुन काम करतात तेव्हा असे आदर्श निर्माण होतात. या शिबीराचं उद्घाटन आ.मुंदडांच्या हस्ते संपन्न झाले. व्यासपीठावर भाजप राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष हिंदुलाल काकडे, माजी नगराध्यक्ष महादेव मस्के, रोटरी क्लब अध्यक्ष स्वप्निल परदेशी, केमिस्ट असोसिएशनचे अरूणआबा काळे, मुस्तफा भाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती. धन्वंतरी पुजा संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविकातुन डॉ.भुतडांनी वर्धापन दिनाची भुमिका मांडली तर डॉ.नवनाथ घुगे यांनी आदर्श उपक्रम आणि त्या मागची रूपरेषा सांगितली. उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना आ.मुंदडांनी या उपक्रमाचं कौतुक करून डॉक्टर मंडळींना शुभेच्छा दिल्या. संवेदनशीलता आणि मानवता डोळ्यासमोर ठेवुन या क्षेत्रात काम केल्यानंतर त्याचा फायदा गोरगरीब रूग्णांना होतो हे सांगताना त्यांनी शहरातील सर्व डॉक्टर मंडळी चांगल्या कामात पुढाकार घेत असल्याचा आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई अ‍ॅम्पा, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, लॅब संघटना, रोटरॅक्ट क्लब, बसव ब्रिगेड संघटना आदींच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी डॉ.नितीन चाटे, डॉ.संदिप थोरात, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.निलेश तोष्णीवाल, डॉ.विनोद जोशी, डॉ.अतुल शिंदे, डॉ.अविनाश मुंडे, डॉ.योगेश मुळे, डॉ.स्नेहल होळंबे, डॉ.अंजली रेड्डी, डॉ.ज्योत्सना चाटे, डॉ.मनिषा भुतडा, डॉ.स्मिता दामा, डॉ.प्रदिप दामा, डॉ.इडगर, डॉ.हणुमंत चाफेकर, डॉ.उद्धव शिंदे, डॉ.सुनिल जाधव, डॉ.सुवर्णकार, डॉ.दिपक पाटील, सचिन गौरशेटे, स्वप्निल गौरशेटे, डॉ.इमरान अली, विश्वास चोबे, मंगे आप्पा, आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होेते. दरम्यान आ.नमिता मुंदडा यांनी डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट देवुन गुलाब पुष्प देवुन त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय ग्रामीण रूग्णालयात जावुन देखील डॉक्टरांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा दिल्या. या शिबीरात एकुण 50 पेक्षा अधिक वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्या घटकांनी रक्तदान केल्याची माहिती डॉ.नवनाथ घुगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

COMMENTS