Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : हाडा

कोपरगाव शहर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी २०२७ रोजी असणाऱ्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कोपरगावात विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा यांनी याबाबत माहिती दिली.   जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपजिल्हाप्रमुख असलम शेख जेष्ठ शिवसैनिक प्रमोद लभडे, बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.  याप्रसंगी हाडा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, संपूर्ण वर्षभर महारक्तदान शिबिरे, वैद्यकीय शिबिरे, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा, विचारवंताची व्याख्याने, ज्येष्ठ शिवसैनिकांचे युवा सैनिकांना मार्गदर्शन शिबिरे, महिला आघाडी बळकटीकरण, भजन कीर्तननाचे कार्यक्रम, शिवसेना संघटनेची बांधणी करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र, अग्रलेख पुस्तकाचे प्रदर्शन तसेच त्यांची भाषणे व्हिडीओ स्वरूपात जन्मानसापर्यंत पोहचवत त्यातून त्यांचे कार्याचा उलगडा करणे आदी वेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव शिवसेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी दिली. याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक मुन्ना मन्सूरी, वैभव शेलार, ऋषिकेश खैरनार, कान्हा हाडा, निखिल कंक्राळे,पियुष  सैंदाणे, राहुल हाडा, विनायक टाक, दिनेश मरसाळे, समीर पटवेकर, शुभम वाघ, आबा पवार,शंतनू चवरे,अर्जुन मोरे, स्वप्नील निरभवणे, शक्ती हाडा, साहिल पटवेकर, रहीम शेख, चेतन हाडा आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूरमध्ये रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू 
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप; दोषींवर कारवाईची ‘स्वाभिमानी’ची मागणी
अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रश्न मार्गी लागणार : वाकचौरे

कोपरगाव शहर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी २०२७ रोजी असणाऱ्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कोपरगावात विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा यांनी याबाबत माहिती दिली.   जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपजिल्हाप्रमुख असलम शेख जेष्ठ शिवसैनिक प्रमोद लभडे, बाळासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. 

याप्रसंगी हाडा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, संपूर्ण वर्षभर महारक्तदान शिबिरे, वैद्यकीय शिबिरे, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आंतर विद्यापीठ व महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा, विचारवंताची व्याख्याने, ज्येष्ठ शिवसैनिकांचे युवा सैनिकांना मार्गदर्शन शिबिरे, महिला आघाडी बळकटीकरण, भजन कीर्तननाचे कार्यक्रम, शिवसेना संघटनेची बांधणी करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र, अग्रलेख पुस्तकाचे प्रदर्शन तसेच त्यांची भाषणे व्हिडीओ स्वरूपात जन्मानसापर्यंत पोहचवत त्यातून त्यांचे कार्याचा उलगडा करणे आदी वेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव शिवसेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी दिली.

याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक मुन्ना मन्सूरी, वैभव शेलार, ऋषिकेश खैरनार, कान्हा हाडा, निखिल कंक्राळे,पियुष  सैंदाणे, राहुल हाडा, विनायक टाक, दिनेश मरसाळे, समीर पटवेकर, शुभम वाघ, आबा पवार,शंतनू चवरे,अर्जुन मोरे, स्वप्नील निरभवणे, शक्ती हाडा, साहिल पटवेकर, रहीम शेख, चेतन हाडा आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS