Homeताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; शाळांतील जंक फूडवर बंदी, सकस आहार अनिवार्य!

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील शाळांम

आरोग्याची खेळ करणार्यांना अभय नकोभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मनसेचे सोमेश्वर कदम यांची मागणी
अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त
मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त
शाळेची उपहारगृह आता तुकाराम मुंढे यांच्या रडारावर… मध्यान्ह भोजन योजनेवरही  करडी नजर… थेट...

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील शाळांमध्ये ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.या मोहिमेअंतर्गत शाळांमधील मध्यान्ह भोजन, वसतिगृहातील मेस आणि कँटीनमधील आहार सुरक्षित, सकस आणि पोषक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.यापुढे शाळांना अन्नपुरवठा करणाऱ्या सर्व संस्था आणि कँटीन चालकांकडे FSSAI चा वैध परवाना असणे अनिवार्य असेल. परवाना नसलेल्या पुरवठादारांकडून अन्न घेण्यास परवानगी दिली जाणार नाही.विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर आणि जाहिरातींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर असेल.याशिवाय प्रत्येक शाळेत ‘ईट राईट स्कूल’ संकल्पना राबवली जाणार असून, वर्षातून किमान दोन वेळा अन्नाची तपासणी केली जाईल. तसेच फूड सेफ्टी सुपरवायझर, स्वच्छ स्वयंपाकगृह आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS