Homeताज्या बातम्या

आमदार साटम यांना मनसेने दाखवले काळे झेंडे

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या एका वक्तव्यावरून मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्

बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा! मुख्याधिकार्‍यावर गुत्तेदार-अभियंत्याला वाचवण्याचा प्रयत्न; नगरपरिषद समोर जागरण गोंधळ आंदोलन लवकरच करणार-वर्षाताई जगदाळे
17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य एल्गार मोर्चागेवराई तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अलीम सय्यद
राजधानीतील आंदोलकांवर बळाचा वापरलाठीचार्जसह अश्रुधूराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवले
अमित साटम यांना काळे झेंडे दाखवले | Saamana (सामना)


मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या एका वक्तव्यावरून मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भांडुप परिसरात आक्रमक आंदोलन छेडले. साटम यांना काळे झेंडे दाखविण्यासह त्यांच्या फलकाला काळे फासून मनसैनिकांनी निषेध नोंदविला.
काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरातील एका दुर्घटनेशी संबंधित कथित दृश्यचित्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित साटम तसेच भारतीय जनता पक्षावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर साटम यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे राजकीय वादाला अधिक धार मिळाली. अमित साटम यांनी, आम्ही केवळ समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे नाही, तर प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत, असे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. या विधानाचा रोख मनसे नेतृत्वाकडे असल्याचे मानले जात असून त्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली. मनसेचे नेते डरपवशशि ऊशीहरिपवश यांनी अमित साटम यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. प्रत्यक्ष कामाचा दावा करणार्‍यांनी संबंधित दुर्घटनांबाबत जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला. या पार्श्‍वभूमीवर भांडुप येथील एका महाविद्यालयाबाहेर मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी अमित साटम यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच परिसरातील त्यांच्या फलकाला काळे फासून संताप व्यक्त करण्यात आला.

COMMENTS