Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर

सातारा - राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजप

संगमनेर येथे कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष शिबिर – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
‘कर्जत बाभूळमुक्त’ अभियानाचा कर्जतमध्ये प्रारंभ; सलग २१०० दिवसांच्या ऐतिहासिक श्रमदानातून नदी संवर्धनाचा उपक्रम
तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अव्वल कारकून मुळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा-डॉ.ढवळे

सातारा – राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला. भाजपनं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे  होता. महाविकास आघाडीतून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रचार करण्यात आला.सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा लोकसभा मतदारसंघात अखेर उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे 13 व्या फेरीनंतर पिछाडीवर गेले आहेत.   

COMMENTS