Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी यांचा शाही विवाह सोहळा थाटात

श्रींचे घट उठविल्यानंतर 10 दिवसांच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात येतात.शिराळा / प्रतिनिधी : खुजगांव, ता. शिराळा येथील श्र

महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय
अंत्री येथील स्वामी समर्थांना सव्वा किलो चांदीचा मुकुट अर्पण
कोविडच्या नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात : ना. शंभूराज देसाई

श्रींचे घट उठविल्यानंतर 10 दिवसांच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात येतात.
शिराळा / प्रतिनिधी : खुजगांव, ता. शिराळा येथील श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी यांचा शाही विवाह सोहळा तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी सांयकाळी 5 वाजुन 27 मिनिटांनी सनई चौघडा मंगल वाद्यात मंत्रघोषात धार्मिक विधीपूर्वक पारंपारिक पध्दतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा थाटात झाला.
या विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. मंदिराचे मुख्य पुजारी शामराव सावंत यांच्या हस्ते आरती करुन मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसांचे घट उठविण्यात आले.
सोहळ्यासाठी पहाटेपासून भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सुशोभित केलेल्या पालखीतुन सायंकाळी पाच वाजता श्री सिध्दनाथाची पंचधातूची उत्सव मुर्ती स्थानापन्न करण्यात आली. नारळाची तोरणे, फुलांच्या माळा आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई यांनी संपूर्ण मंदीर सुरेख सजविण्यात आले होते. दिवसभर मंदीराच्या प्रांगणात या विवाह सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांची व चाकरमान्यांची तसेच ग्रामस्थांची गर्दी वाढत होती.

COMMENTS