शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. याच महाराष्ट्रात अध्यात्म, देव-धर्माच्या आडून भविष्य, फलज्योतिष, ग्रहांची पीडा, अज्ञाताची भीती, पूजा, मंत्र-तंत्र, करणी, भानामती अशा मार्गांनी इच्छित फलप्राप्तीचा दावा करून ऑक्टोपसच्या हजार हातांप्रमाणे बुवाबाजी फोफावत चालली आहे. त्यात सामान्य माणसापासून ते उच्चपदस्थ लोकांसह राजकारणीही मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. यातून लोकांची आर्थिक, मानसिक तसेच महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची असंख्य प्रकरणे उघड होत आहेत.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागात किंवा परिसरात अशा प्रकारचे छोटे-मोठे भोंदू बुवा, बाबा, मांत्रिक, अम्मा असतील तर त्यांचे संपूर्ण नाव, वय, बसण्याचे ठिकाण, कोणत्या वारी पाहतात, कोणकोणत्या समस्यांवर उपाय करतात, काय उपचार करतात, मोबदला रोख वा वस्तूरूपात काय घेतात, पावती देतात का, मंदिर असेल तर ते धर्मादाय विभागाकडे नोंदणीकृत आहे का, किती लोक येतात, अशी माहिती लिखित स्वरूपात सही करून आपल्या मोबाईल नंबरसह प्राचार्य डॉ. सविता शेटे, गुलमोहर, आनंद नगर, कॅनॉल रोड, बीड – 431122 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावी किंवा प्रत्यक्ष आणून द्यावी अथवा 9422243236 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावी. माहिती पाठवणार्यांचे नाव व मोबाईल नंबर पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येतील. समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून आपण हे सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS