Homeताज्या बातम्याबीड

उर्दुघर ला मिळाली तातडीने निधीसह मंजुरीआ.संदिप क्षीरसागरांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार

जिल्ह्यात उर्दु भाषेचे संवर्धन, साहित्य प्रसार आणि सांस्कृतीक चळवळीला गती देण्यासाठी बीड शहरात उर्दुघर उभारण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा मागील

पोलिस पाटील संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कृष्णा कदम यांची निवडसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
जाटनांदूर येथे गुजर समाजाच्या वतीने महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी



जिल्ह्यात उर्दु भाषेचे संवर्धन, साहित्य प्रसार आणि सांस्कृतीक चळवळीला गती देण्यासाठी बीड शहरात उर्दुघर उभारण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. आणि त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, शासनाकडून बीड शहरात उर्दुघर उभारणीसाठी निधीसह मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.सुनेत्राताई पवार व उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.
बीड शहरात उर्दुघर उभारणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आ.संदीप क्षीरसागर प्रयत्नशील होते. या बाबत आ. क्षीरसागर यांचा शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या संदर्भात काही दिवसांपुर्वीच आ. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच, शासनाकडे याबाबत सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता. त्यावर शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून बीड शहरात उर्दुघर उभारणीसाठी अधिकृत मंजुरी मिळाली असून, पुढिल प्रशासकीय प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या वास्तूमुळे बीड शहरात, उर्दु भाषा, साहित्य आणि सांस्कृतीच्या जतनासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या झालेल्या सकारात्मक आणि ऐतिहासिक निर्णयामुळे आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल कृतज्ञता व आभार व्यक्त केले आहेत. सोबतच आ.क्षीरसागरांच्या पाठपुराव्याने मिळालेल्या या यशामुळे हा मास्टरस्ट्रोक ठरला असून, मुस्लिम समाजात आ.क्षीरसागर यांच्यासाठी सकारात्मक लहर तयार झाल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS