उन्नाव बलात्कार पीडितेची आई लढणार निवडणूक

Homeताज्या बातम्या

उन्नाव बलात्कार पीडितेची आई लढणार निवडणूक

काँग्रेसच्या 125 उमेदवारांची पहिल्या यादीत 40 महिलांचा समावेश

लखनऊ : उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली असतांना काँगे्रसने सर्वात अगोदर आपल्या 125 उमेदवारांच्या नाव

BREAKING: सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक!
सार्वजनिक बांधकाम विभागात बदलीकांड ; अधिकार्‍याच्या बदल्यांच्या अधिकारावर राज्यमंत्री कार्यालचे अतिक्रमण
येवल्यात एस.टी.कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू (Video)

लखनऊ : उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली असतांना काँगे्रसने सर्वात अगोदर आपल्या 125 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला देखील काँगे्रसकडून तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 125 उमेदवारात 40 महिलांचा समावेश आहे.
महिलांच्या नावांची घोषणा करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, या सर्व महिला संघर्ष करणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा देवी यांनाही तिकीट दिले आहे. पत्रकार परिषदेत प्रियांका गांधी म्हणाल्या, 125 उमेदवारांच्या यादीत 50 महिला आहेत. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावेत, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही यूपीच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू, असा आमचा प्रयत्न आहे. सलमान खुर्शीद यांच्या पत्नीलाही तिकीट देण्यात आले आहे.प्रियांका गांधी म्हणाल्या की, या यादीत काही महिला पत्रकार आहेत. एक अभिनेत्री आणि बाकीच्या संघर्षशील महिला आहेत, ज्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्षे संघर्ष केला. आज यूपीमध्ये हुकूमशाही सरकार आहे. समस्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नेत्यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्‍नावर प्रियांका गांधी म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत असे घडते. काही लोक येतात, काही लोक जातात. काही घाबरतात. आपल्या संघर्षाला धैर्याची गरज आहे. कोणी निघून गेल्यावर त्रास होतोच. 10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही. दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये भाजपला गळती लागली असून, आतापर्यंत तीन कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले असून, 8 आमदारांनी राजीनामे देत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला सपाकडून तगडे आव्हान मिळण्याची शक्यता उत्तरप्रदेशात वर्तवण्यात येत आहे. नी यांनी गुरुवारी अचानक भाजपचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. प्रसारमाध्यमांनी धर्म सिंह सैनी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाइल बंद होता. त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे मोबाइलही बंद होते. ते त्यांच्या सरकारी बंगल्यावरही नव्हते. त्यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत गुप्त बैठक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS