Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा ः राज ठाकरे

मुंबई ः महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला जपले पाहिजे. मराठीची व्याप्ती ही अत्यंत अफाट आहे. तरीदेखील आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत. सध्या

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
 अनेक मुद्द्यांवर शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि चर्चा झाली – राज ठाकरे
राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

मुंबई ः महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला जपले पाहिजे. मराठीची व्याप्ती ही अत्यंत अफाट आहे. तरीदेखील आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत. सध्या राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहोत, त्यामुळे राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकणे हे सक्तीचे करायला हवे, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रावर तीन दिवसीय विश्‍व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनप्रसंगी राज ठाकरे बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी भाषेला देखील फटकारले. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. मराठी, तमिळ, तेलुगु या जशा भाषा आहेत, तशीच हिंदी ही एक भाषा आहे. राष्ट्रभाषेचा निवाडा आपल्याकडं कधीच झालेला नाही असे राज ठाकरे म्हणाले. भाषेच्या अनुषंगाने चर्चा होत असताना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा प्रचार हल्ली अनेक ठिकाणी केला जातो. सर्वसामान्यांना देखील असेच वाटते. मात्र, वास्तव तसे नाही. राज ठाकरे यांनी संमेलनात बोलताना याच मुद्द्याकडे लक्ष वेधले. मराठी माणूस जगभरात पसरलेला आहे. अनेक देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांच अभिनंदन केले पाहिजे. महाराष्ट्राचा विचार इतर लोकांमध्ये, देशांमध्ये जितका नेता येईल. आपली संस्कृती, परंपरा जितकी देशाबाहेर नेता येईल तितके चांगलेच आहे. पण महाराष्ट्राकडेही आपण लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आज मराठीऐवजी हिंदी कानावर येऊ लागते, त्यावेळी मला त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. हिंदी भाषा उत्तमच आहे. मात्र, हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. अमूक एखादी भाषा राष्ट्रभाषा आहे असा कुठलाही निर्णय झालेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांचा वापर करण्याचे ठरले. यापेक्षा अधिक काही नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

मराठी भाषेला बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न – हिंदी ही उत्तम भाषा आहे. हिंदी सिनेमांतून ती आपल्याकडे आली. पण आपण बोलण्यात हिंदी का वापरतो हे समजत नाही. मराठी भाषा इतकी उत्तम आहे. या भाषेत जो विनोद होतो, तो दुसर्‍या कुठल्या भाषेत होतो असं मला वाटत नाही. इतकी समृद्ध भाषा आहे. मात्र, ही भाषा बाजूला सारण्याचा जो राजकीय प्रयत्न होतोय ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाते, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. गेली अनेक वर्ष मी मराठी विषयावर बोलतोय, अंगावर केस घेतल्या आहेत. मराठीच्या मुद्द्यावर मी जेलमध्येही गेलो. मी अत्यंत कडवट मराठी असल्याचे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.

COMMENTS