आयजीच्या जीवावर बायजी उदार; महाविकास आघाडीचा भंकस कारभार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयजीच्या जीवावर बायजी उदार; महाविकास आघाडीचा भंकस कारभार

नाशिक /प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरी नाशिक शहर आणि जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सख्य दिवसेंदि

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण.. जिवे ठार मारण्याची धमकी (Video)
महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा
भाजप विरुद्ध ‘मविआ’आज सामना रंगणार

नाशिक /प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरी नाशिक शहर आणि जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सख्य दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागल्याने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

याआधी सहा महिन्यांपुर्वी माजी खा.समिर भुजबळ आणि खा.संजय राऊत या दोन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाशिक महापालिका निवडणूका स्वबळावर लढविण्यासंदर्भात कलगीतुरा रंगला होता.महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वादाचा धुरळा खाली बसला असला तरी अंतर्गत कुरबुरी मात्र थांबल्याचे चित्र दिसत नाही.

छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू असतानाच नांदगावच्या विकास निधीवरून आ.सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली होती.छगन भुजबळांवर निधी चोरल्याचा आरोप करण्यापर्यंत आ.कांदेंची मजल गेली होती.या वादात काही काळासाठी अंडरवर्ल्ड टोळीचाही संदर्भ आल्याने काही काळासाठी नाशिककरांचीही चांगलीच करमणूक झाली आणि प्रसार माध्यमांनाही ब्रेकींगसाठी खाद्य मिळून स्लाॕट भरण्याची सोय झाली.सध्या मातोश्री आणि सिल्वर ओकच्या हस्तक्षेपानंतर या वादाची आग शमली असे वाटत असले तरी अंतर्गत निखारा मात्र धुमसत आहे.

देवळाली मतदार संघातूनही अशी आग लागणार असा संकेत देणारा धुर निघू लागला आहे.आजी माजी आमदारांमध्ये विकास कामांचे श्रेय लाटण्यावरून सुरू झालेली हमरीतुमरी बांगड्यांच्या खणखणाटासह रस्त्यावर येण्याची भाषा वापरली जाऊ लागल्याने असंगाशी संग झाला की काय अशी शंका सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना देऊ लागली आहे.

वास्तविक विकास कामांसाठी निधी सरकार देते.मतदारांच्या घामातून गोळा झालेली पैपै एकत्र करून भरलेल्या तिजोरीतून हा निधी दिला जातो,जनता मालक असलेल्या निधीवरून भांडण कोण करते ,तर लोक प्रतिनिधी.आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणतात ते असे.जनतेला विकास हवाय.आजीने केला की माजीने याविषयी जनतेला काही देणे घेणे नाही.

COMMENTS