Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून यंदा सव्वा लाख टन द्राक्षांची निर्यात

राज्यातून युरोपला तब्बल 38 हजार टन द्राक्षे रवाना

पुणेः यंदा राज्यात दाक्षाचे उत्पादन मोठया प्रमाणावर झाल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातून जगभरात द्राक्षांची निर्यात देखील सुरु झाली आहे. देशातून आजव

Solapur : ऊसाच्या एकरकमी FRP साठी सोलापुरमध्ये रयत क्रांती संघटनेचा धडक मोर्चा (Video)
दहिवडी पोलिसांचा मार्डी येथे छापा; 9 लाखाचा गांजा जप्त
कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर

पुणेः यंदा राज्यात दाक्षाचे उत्पादन मोठया प्रमाणावर झाल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातून जगभरात द्राक्षांची निर्यात देखील सुरु झाली आहे. देशातून आजवर 1 लाख 25 हजार टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यापैकी युरोपला 38,556 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीत राज्याचा वाटा जवळपास 95 टक्क्यांपर्यंत आहे.
मार्च, एप्रिल महिन्यांत वेगाने द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देशातून सव्वा लाख टन द्राक्षांची निर्यात झाली असून, प्रामुख्याने बांगलादेशला 31659 टन, संयुक्त अरब अमिरातीला 4728 टन, नेपाळला 6413 टन आणि रशियाला 1168 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. युरोपला देशातून 38.556 लाख टनांची निर्यात झाली आहे, त्यात राज्याचा वाटा 38,531 टन इतका आहे. नेदरलँण्डला सर्वाधिक 28728 टन, ब्रिटनला 3407 टन, जर्मनीला 2012 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. राज्यात नाशिक जिल्ह्याने निर्यातीत मोठी आघाडी घेतली आहे. नाशिकमधून 35799 टन, सांगलीतून 1602 टन, सोलापुरातून 571 टन, नगरमधून 200 टन, पुण्यातून 173 टन, लातूरमधून 50 तर उस्मानाबादमधून 32 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.राज्यातील द्राक्षांना बांगलादेशातून मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातून सुपर सोनाक्का, आनुष्का आदी वाणांच्या द्राक्षांची बांगलादेशाला निर्यात होते. यंदा बांगलादेशाने शेतीमालाच्या आयातीवर 120 टक्के आयात कर लादला आहे. त्यामुळे हजार रुपयांच्या द्राक्षाच्या क्रेटला 1200 रुपये कर भरावा लागतो आहे. याचा विपरीत परिणाम निर्यातीवर होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.

COMMENTS