Homeताज्या बातम्या

मुंबईतून दहशतवादविरोधी पथकाकडून हुझैफाला अटक; मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश

मुंबई : राजधानीतील विशेष पोलीस पथक (स्पेशल सेल) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) संयुक्त कारवाईत दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा

भोंदू अशोक खरातला मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई; कोट्यवधींची रोकड, दागिने आणि आलिशान मोटार जप्त
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी २० जून रोजी
मुंबईतील वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त; अन्न, नागरी पुरवठा विभागाची कारवाई
दाऊद-आयएसआय गटातील दहशतवादी हुफैझाला मुंबईतून अटक

मुंबई : राजधानीतील विशेष पोलीस पथक (स्पेशल सेल) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) संयुक्त कारवाईत दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या ‘हुझैफा’ नावाच्या संशयिताला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याचे पाकिस्तानस्थित सूत्रधारांशी तसेच गुन्हेगारी आणि दहशतवादी जाळ्याशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक आणि दहशतवादविरोधी पथक गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत होते. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, हुझैफा हा परदेशातून कार्यरत असलेल्या काही व्यक्तींच्या संपर्कात होता आणि त्याला तेथून विविध प्रकारच्या सूचना व आदेश मिळत असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर दीर्घकाळ लक्ष ठेवले होते, त्यानंतर मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या प्रकरणाशी संबंधित दहशतवादी जाळ्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ संशयितांना देशातील विविध राज्यांतून अटक करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि पंजाब या राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने छापेमारी आणि शोधमोहीम सुरू होती. हुझैफाच्या अटकेनंतर त्याच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्ती, त्यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या कारवाया तसेच संभाव्य लक्ष्यांबाबत (Targets) सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांविरोधातील तपासाला मोठा वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यास सांगितले आहे.

COMMENTS