Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतीने केली पत्नीची हत्या

नांदेड प्रतिनिधी - जिल्ह्यातल्या परोटी तांडा या गावात एक खळबळजनक आणि तेवढीच चिड आणणारी घटना समोर आली आहे. तू दिसायाला चांगली नाहीस असं सांगत पत्

राज्यात 75 नाट्यगृहेे उभारणार ः मंत्री मुनगंटीवार
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धान्याचे किट वाटप
गावरान आंब्याची चव महागणार

नांदेड प्रतिनिधी – जिल्ह्यातल्या परोटी तांडा या गावात एक खळबळजनक आणि तेवढीच चिड आणणारी घटना समोर आली आहे. तू दिसायाला चांगली नाहीस असं सांगत पत्नीला मारहाण करुन पतीने तिची हत्या केली आहे. तू दिसायला चांगली नाहीस, तुझ्या माहेरी जा आणि पैसे घेऊन ये असंही हा पती त्याच्या पत्नीला म्हणाला होता. 6 मे रोजी त्याने तिला मारहाण केली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. रेश्मा गोकुळ चव्हाण असं विवाहितेचं नाव आहे. गोकुळ नामदेव चव्हाण असं तिच्या पतीचं नाव आहे. गोकुळने रेश्माला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गोकुळ आणि रेश्मा या दोघांचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं होतं. या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सगळं काही सुरळीत सुरु होतं. मात्र पती गोकुळ चव्हाण, सासू विमला चव्हाण आणि दीर कृष्णा चव्हाण हे रेश्माला त्रास देऊ लागले. तू माहेरी जा आणि खर्चासाठी पैसे घेऊन ये असा तगादा तिच्या मागे लावू लागले. या कारणावरून पती गोकुळ चव्हाण हा पत्नी रेश्माला बेदम मारहाण करत असे. 6 मे रोजीही अशीच मारहाण रेश्माला करण्यात आली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

COMMENTS