Homeताज्या बातम्यादेश

चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन

विनयभंगाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
लोखंडी सळीने पतंग काढण्याच्या प्रयत्नात 13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू 
आरक्षणासाठी धनगर समाज मैदानात

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन त्याच्या ग्राहकाला अन्न पोहोचवत असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी माणसाबद्दल सहानुभूती दाखवली, तर काहींनी पैसे कमवण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करण्याऐवजी त्याच्या काम करण्याच्या दृढनिश्चयाचे कौतुक केलं.रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलीची काळजी घेण्याच्या या माणसाच्या निर्णयाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ शेअर केला जो व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली; Zomato डिलिव्हरी पार्टनर त्याच्या दोन मुलांसह संपूर्ण दिवस उन्हात घालवतो. माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो हे आपण शिकले पाहिजे” असं म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी आपल्या लहान मुलांची काळजी घेत असतानाही कठोर परिश्रम करण्याच्या व्यक्तीच्या जिद्दीचं कौतुक केलं.व्हिडिओमध्ये, आम्ही एजंट ऑर्डर वितरित करण्यासाठी ग्राहकाच्या दारात उभा असलेला पाहायला मिळतो. त्यावेळ त्याने आपल्या चिमुकवल्या लेकीला देखील कुशीत घेतलं आहे. ही क्लिप इतकी व्हायरल झाली की झोमॅटोने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि त्या माणसाला मदतीचा हात पुढे केला. झोमॅटोने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, “कृपया ऑर्डरचे तपशील पर्सनल मेसेजमध्ये शेअर करा जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरपर्यंत पोहोचू आणि मदत करू शकू.”Instagram वर शेअर केल्यापासून, व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि सोशल मीडिया युजर्सकडून हजारो कमेंट मिळाल्या आहेत. एका युजने अशा डिलिव्हरी एजंटना मदत केल्याबद्दल आणि त्यांना पैसे कमवण्याचे व्यासपीठ दिल्याबद्दल झोमॅटोचे आभार मानले आहेत. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हे खूप प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असो, आपण कठोर परिश्रम केले पाहिजे.” आणखी एका युजरने बाप हाच खरा हिरो असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

COMMENTS