Homeताज्या बातम्या

एकच कत्तलखाना दोनदा कसा हटविला? : हाडा  

Oplus_131072 कोपरगाव : शहरातील कथित अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई केल्याच्या नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या दहा

जनगणनेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह?नागरिकांकडून माहिती लपविण्याचे प्रकार, प्रगणकांवर दबाव असल्याची चर्चा
राहता तहसीलच्या ‘संजय गांधी’ विभागात सावळागोंधळ?नागरिकांची तक्रार ; कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी  
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
Oplus_131072


कोपरगाव : शहरातील कथित अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई केल्याच्या नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या दहा दिवसांच्या अंतराने एकाच स्वरूपाची कारवाई झाल्याचे प्रसिद्ध झाल्याने पहिली कारवाई खरी की दुसरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख गगन हाडा यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरत “एकच कत्तलखाना दोनदा कसा हटविला?” असा सवाल उपस्थित केला आहे.    
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरात १० दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून शहरातील अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई करून अतिक्रमण हटविल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्याच प्रकारची कारवाई करून “बीफ मार्केट उध्वस्त” केल्याचे प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे पहिली कारवाई केवळ दिखावा होती का, असा संशय व्यक्त केला जात आहे.जर पहिल्यांदाच कत्तलखानं पूर्णपणे हटवलं होतं, तर आता पुन्हा कोणत्या कत्तलखान्यावर कारवाई करण्यात आली? आणि जर आताची कारवाई खरी असेल, तर पहिल्यावेळी जनतेची दिशाभूल का करण्यात आली?” असा थेट सवाल गगन हाडा यांनी उपस्थित केला आहे.  यावेळी त्यांनी नगर परिषद आणि संबंधित यंत्रणा कोणाला तरी संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोपही केला.
गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली केवळ फार्स सुरू असल्याची टीका करत हाडा म्हणाले, “जनतेला फसवायचं की जिल्हा प्रशासनाला, हे प्रशासनाने स्पष्ट करावं. धार्मिक भावना आणि कायद्याचा केवळ दिखावा करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत. असा इशार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

COMMENTS