Homeताज्या बातम्या

माणुसकीची धाव! शेख हमीद (शफिक भाऊ) यांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी नुरू खान यांना मिळाले नवजीवन

संकटकाळात माणसाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद (शफिक भाऊ) यांनी गंभीर जखमी झाल

चारधाम यात्रेत दोन भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील भाविकांचा समावेश
भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! नांदेडमध्ये खेळता खेळता ४ मुलं पाण्यात बुडाली



संकटकाळात माणसाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद (शफिक भाऊ) यांनी गंभीर जखमी झालेल्या पठाण नुरू शानूर खान यांना वेळेत उपचार मिळवून देत त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली.
माजलगाव शहरातील ईदगाह मोहल्ला येथील रहिवासी पठाण नुरू शानूर खान हे चांदणी ग्राउंड परिसरातील झमझम कॉलनीमध्ये भिंतीच्या प्लास्टरचे काम करत असताना अचानक पाय घसरून उंचावरून खाली पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील विशेष उपचारांची आवश्यकता डॉक्टरांनी व्यक्त केली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद (शफिक भाऊ) यांनी कोणतीही वेळ न दवडता पुढाकार घेतला. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून नुरू खान यांना प्रथम संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बीड येथील काकू नाना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे मेंदू व मणका तज्ज्ञ डॉ. समीर आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अरशियान मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. उपचाराच्या संपूर्ण काळात शेख हमीद यांनी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून उपचारांचा सातत्याने पाठपुरावा केला. रुग्णाच्या कुटुंबाला मानसिक आधार देतानाच आवश्यक ती सर्व मदतही त्यांनी उपलब्ध करून दिली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना आणि वेळेत मिळालेल्या उपचारांना यश येत नुरू खान यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. अखेर त्यांना सुखरूप रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेख हमीद (शफिक भाऊ) यांनी केलेल्या या माणुसकीच्या कार्याचे शहरभरातून कौतुक होत आहे. गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांसाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी शेख हमीद म्हणाले, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कोणालाही वैद्यकीय किंवा सामाजिक अडचण आली तर मी नेहमी मदतीसाठी तत्पर राहीन. संकटाच्या क्षणी दिलेला आधार एखाद्याचे जीवन वाचवू शकतो, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा माजलगावकरांना आली आहे.

COMMENTS