Homeताज्या बातम्या

कंधार-मुखेड रोडवर भीषण अपघात; ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू

नांदेड : कंधार तालुक्यातील अंबुलगा-मायतगाव परिसरातील कंधार-मुखेड मार्गावर ट्रॅक्टर हेड पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरु

कारवाई की पाठराखण? नियंत्रण कक्षातून थेट वाहतूक शाखेत मारोती मुंडे यांची नियुक्ती; पोलीस दलात चर्चेला उधाण
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मुंबईतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेला नराधम जेरबंद
मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत अवैध रेतीचा टिप्पर जप्त, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू -  mahanagarnews

नांदेड : कंधार तालुक्यातील अंबुलगा-मायतगाव परिसरातील कंधार-मुखेड मार्गावर ट्रॅक्टर हेड पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २८ मे) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत चालकाचे नाव बालाजी गोविंद कदम (वय ४१, रा. हिप्परगा (शहा), ता. कंधार, जि. नांदेड) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, बालाजी कदम हे शेतमजुरीच्या कामानिमित्त ट्रॅक्टर घेऊन जात असताना दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास अंबुलगा-मायतगाव परिसरात त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रॅक्टरचा वेग अधिक असल्याने तो अचानक रस्त्यावर पलटी झाला. या भीषण अपघातात चालक ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कंधार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हिप्परगा (शहा) गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

COMMENTS