Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा

मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असतांना दुसरीकडे ओबीसी समाज देखील ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत मैदानात उतरला आहे. दोन्ही बाजूंने ए

मदत करत असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात तालिबानी अतिरेकी झाले आक्रमक… झेंडा फाडला
गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ना. आशुतोष काळे
राजकारणाचा उकीरडा

मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असतांना दुसरीकडे ओबीसी समाज देखील ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत मैदानात उतरला आहे. दोन्ही बाजूंने एकमेकांना शह-प्रतिशाह देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना, दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मंगळवारी ओबीसींच्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आहे.
यासंदर्भात बोलतांना शेंडगे म्हणाले की, अधिकार असताना देखील सत्तेचा वाटपा आमच्यापर्यंत पोहचू शकलेला नाही. त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्यापुढे नव्हता. ओबीसींच्या पक्षाचे नाव व घटनेच्या अभ्यासासाठी एक 15 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पक्षाचे नाव घोषित केले जाईल, अशी माहिती देखील शेंडगे यांनी दिली आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाचे तीन-तेरा वाजतांना दिसून येत आहे.  मराठा समाजाने सत्तेच्या माध्यमातून सत्तेवर दबाव टाकून आमच्या आरक्षणाचा सत्यानाश केला आहे. ओबीसी भटके मुक्त, मागासवर्गीय समाज आणि सर्व मिळून आपले राज्य आणायचे असे ठरले आहे. यासाठी राजकीय पक्ष काढण्याचा ठराव मंजूर झाला आहे. आता ही आरक्षणाची लढाई राजकीय लढाई म्हणून येऊन ठेपली आहे. स्वत:च सरकार यासाठी आम्ही हे पाऊल उचलेले आहेत. लोकसभेसाठी आमचे सर्वच मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. आता ओबीसींना तिकीटासाठी वणवण फिरावे लागणार नाही. छगन भुजबळ हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी पक्ष सोडून लगेच बाहेर पडावे असे आम्ही म्हणणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी आणि भटके विमुक्त समाज आमच्या पाठिशी आहे. छगन भुजबळ हे नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास केला आहे, त्यावर मनोज जरांगे यांनी टीका करणे चुकीचे आणि वास्तववादी नाही. ओबीसींच्या भावनासाठी आम्ही पक्ष स्थापन केल्याचे यावेळी शेंडगे यांनी सांगितले.

राज्यात ओबीसींची संख्या 60 ते 65 टक्के – राज्यात ओबीसी नागरिकांची संख्या जवळपास 60 ते 65 टक्के असतांना सुद्धा सगळे खासदार मराठा, सगळे आमदार मराठा, घटनेचा अधिकार असताना सुद्धा सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊन दिला नाही. आता पक्ष स्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे उरला नव्हता. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन ओबीसीचा पक्ष स्थापन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.

COMMENTS