HomeUncategorized

विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद येथे प्रभाग 5 मध्ये राहणारे व आरडगाव येथील पत्रकार सुरेश भोईटे यांच्या पत्नी सीमा सुरेश भोईटे (वय 40) यांचे विजेचा शॉक

कराड अर्बन बँकेचा 105 वा वर्धापनदिन उत्साहात
शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत
वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही स्वराने गाठली गुणांची शंभरी; दहिवडी कन्या शाळेतील कु. स्वरा टकले हिने दहावी परिक्षेत मिळवले 100 टक्के गुण

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद येथे प्रभाग 5 मध्ये राहणारे व आरडगाव येथील पत्रकार सुरेश भोईटे यांच्या पत्नी सीमा सुरेश भोईटे (वय 40) यांचे विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे भोईटे परिवार दुःखाचा डोंगर कोसळला.
दि. 11 रोजी घरातील रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान घरातील फरशी पुसत असताना फ्रिजच्या खालची स्वच्छता करताना त्यांना जोराचा विजेचा झटका बसला. जोरदार आवाजाने मुलगा व त्याचे मित्र घरात आले. काही मित्र त्यांना सोडविण्यासाठी पुढे गेले असता त्यांनाही जोरदार झटका बसला. त्यानंतर त्यांना खाजगी दवाखान्यात नेले असता मृत घोषित करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानात स्व:ता सत्संगच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी कार्य करणार्‍या सिमा भोईटे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार सुरेश भोईटे यांचा मोठा मित्र परिवार असून त्यांच्या गावी आरडगाव येथेही संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. रात्री उशिरा लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

COMMENTS