Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरात समता परिषदेचा जनजागृती रथ दाखल

राहाता : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभर जनजागृतीसाठी नियोजित करण्यात आलेला रथ बुधवारी (दि. १५ एप्रिल) राहाता शहरात दाखल झाल

एससीमधील उपवर्गीकरण रद्द करा; ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
पाच नंबर साठवण तलावाचे पाणी कुठे जाते? : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गंगुले 

राहाता : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभर जनजागृतीसाठी नियोजित करण्यात आलेला रथ बुधवारी (दि. १५ एप्रिल) राहाता शहरात दाखल झाला. या रथाचे नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मंत्री छगनराव भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा रथ संपूर्ण वर्षभर भारतभर फिरणार असून समाजजागृती, शिक्षण व समता मूल्यांचा प्रसार करण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे. विशेषत: भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या वारशाशी निगडित विचारांचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येत आहे.

समस्त माळी पंच ट्रस्ट (राहाता)चे अध्यक्ष मच्छिंद्र बनकर यांनी या रथासाठी महामानवांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यासाठी स्वखर्चातून साहित्य देऊन सहकार्य केले. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा रथ देशभर गावोगावी जाऊन समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणार असून लहान मुलांना तसेच समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. आकर्षक देखाव्यामुळे हा रथ नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, शिवाजी बनकर, भिवसेन गाडेकर, नानासाहेब गाडेकर, वैभव आनप, अशोक तुपे, हरिभाऊ गाडेकर, राजेंद्र जेजुरकर, शहराध्यक्ष संतोष लोंढे, मच्छिंद्र निधाने, नगरसेवक सचिन बनकर, पप्पू शेळके, भिमराज निकाळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुकाध्यक्ष किशोर बोरावके, साहेबराव निधाने, विकास लोंढे, निरंजन बनकर, सागर मेहेत्रे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS