Homeताज्या बातम्यादेश

देशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पुढील पाच दिवस नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. उत्

अंदमानात मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता
राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
नागपूर, वर्ध्यात उष्णतेची लाट


नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पुढील पाच दिवस नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. उत्तर भारतासह मध्य आणि पश्‍चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून हवामान विभागाने दहा राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अत्यंत उच्च तापमानाची नोंद झाली असून वर्धा येथे 46.5 अंश, अमरावती येथे 46.4 अंश आणि अकोला येथे 46.3 अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील चित्तोडगड, पिलानी आणि श्रीगंगानगरसह अनेक भागांतही तापमान 46 अंशांच्या पुढे गेले. हरियाणातील सिरसा येथेही उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवला. अनेक शहरांमध्ये दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले होते, तर काही ठिकाणी डांबरी रस्ते वितळल्याच्या घटना घडल्या. खाजगी हवामान संस्थांच्या अंदाजानुसार 24 मेपर्यंत देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील काही भाग वगळता जवळपास अर्ध्या देशात उष्ण व कोरडे वातावरण राहील. अनेक भागांमध्ये कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास राहू शकते. यापूर्वी पाऊस देणार्‍या हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये या हंगामातील सर्वाधिक उष्णता अनुभवायला मिळाली. खजुराहो येथे 46.8 अंश तापमान नोंदवण्यात आले, तर उज्जैनमध्ये 45.4 आणि खंडवा येथे 45.1 अंश तापमानाची नोंद झाली. राजधानी भोपाळमध्येही पारा 44 अंशांपर्यंत पोहोचला. उष्णतेच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा, वीज विभाग आणि आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्याबरोबरच संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजस्थानातील 19 जिल्हे, उत्तर प्रदेशातील 33 जिल्हे आणि पंजाबमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा केशरी इशारा जारी करण्यात आला असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासह गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेसह रात्रीही उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही उष्णतेची लाट कायम राहील. दुसरीकडे आसाम, मेघालय, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS