Homeताज्या बातम्यादेश

अमेरिकेत इस्लामिक सेंटरमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन दिएगो येथे असलेल्या इस्लामिक केंद्राच्या परिसरात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या

दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!
भटक्या कुत्र्यांवरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालय ठामलोकांची सुरक्षा महत्वाची ; सार्वजनिक ठिकाणावरून भटके कुत्रे हटवण्याचे निर्देश
मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश


वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन दिएगो येथे असलेल्या इस्लामिक केंद्राच्या परिसरात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन संशयितांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची द्वेषातून प्रेरित गुन्हा या दृष्टीने चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी इस्लामिक केंद्राच्या मशिदीजवळ अचानक गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सीलबंद केला. नागरिकांनी काही काळ घराबाहेर पडू नये, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला. स्थानिक पोलिस प्रमुख स्कॉट वॉल यांनी सांगितले की, घटनास्थळाजवळ उभी असलेल्या एका वाहनात दोन संशयित मृतावस्थेत आढळून आले. त्यांचे वय अनुक्रमे 17 आणि 18 वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दोघांनी हल्ल्यानंतर स्वतःवर गोळी झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या इस्लामिक केंद्राच्या आवारात धार्मिक शिक्षणासाठी मदरसा देखील असून, गोळीबाराच्या वेळी तेथे विद्यार्थी उपस्थित होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. सुदैवाने विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे पावणेबाराच्या सुमारास गोळीबाराची पहिली माहिती मिळाली. त्यापूर्वी एका महिलेने तिचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच्याकडे शस्त्रे असल्याचे आणि त्याचे वाहनही गायब असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. या माहितीचा आणि गोळीबाराचा संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.

COMMENTS