Homeताज्या बातम्या

दहावी उत्तीर्ण दानिश अनीस सय्यद याचे हार्दिक अभिनंदन; बीडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्या शुभेच्छा

बीड: दहावी बोर्ड परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यार्थी दानिश अनीस सय्यद याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या यशोशिखराबद्दल त्याच्य

आ. केराम यांचे नीलकंठ कातले व प्रकाश कुडमते हेच अधिकृत स्वीय सहाय्यक; अनधिकृत दाव्यांमुळे होणारा संभ्रम टाळण्याचे आवाहन
दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला
NEET पेपरफुटी आंदोलन हिंसाचार प्रकरण: तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड: दहावी बोर्ड परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यार्थी दानिश अनीस सय्यद याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या यशोशिखराबद्दल त्याच्या पुढील शैक्षणिक व यशस्वी वाटचालीसाठी मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी राहत अर्बन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. शफीक हाशमी सर, शाखा अधिकारी शेख अय्युब सर, पत्रकार सय्यद अर्शद, सय्यद सफीर, सय्यद हसन व शेख यासीन पाशा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांनी दानिशच्या या घवघवीत यशाचे विशेष कौतुक केले आणि त्याने भविष्यातही असेच मोठे यश संपादन करून उत्तरोत्तर प्रगती करावी, अशा भावना व्यक्त करत त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS