Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार स्व. राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

माहूर : तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार स्वर्गीय राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माहूर येथे कार्यरत राहून सध्या केज

केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा नवा उच्चांक
बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित

माहूर : तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार स्वर्गीय राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माहूर येथे कार्यरत राहून सध्या केज (जि. बीड) येथे तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या गिड्डे यांचे दि. 9 एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण माहूर तालुक्यात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. गिड्डे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेसाठी सदैव तत्पर असलेले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनातील विविध कामे पारदर्शकपणे व जबाबदारीने पार पाडत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप, शिक्षण परिषदेचे एस. एस. पाटील व पत्रकार साजिद खान यांनी स्व. गिड्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी राबविलेल्या विविध अभिनव उपक्रमांचीही आठवण यावेळी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून स्व. राकेश गिड्डे यांना श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार अभिजीत जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे, पुरवठा निरीक्षक निलेश राऊत, शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष एस. एस. पाटील, पत्रकार साजिद खान, सहाय्यक महसूल अधिकारी प्रभू पानोडे, महसूल सहाय्यक राजू राठोड, शेतकरी संघटनेचे नेते अविनाश टनमने, वैभव पांढरे, वैभव घोडे, मिरजगावे, डॉ. अरुण धकाते,  प्रकाश शेडमाके, विलास शेडमाके, रेणुकादास आठवले, पोलीस पाटील पवन बेहेरे व तोडसाम मामा आदी उपस्थित होते.

COMMENTS