Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरजजवळ काळीज हेलावणारा अपघात! भरधाव कार थेट उभ्या ट्रकमध्ये घुसली; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू, थरारक CCTV फुटेज आले समोर!

https://www.youtube.com/watch?v=B9iZ7hK8OGw रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणार

खरातला आज न्यायालयात करणार हजर; महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी औषधांचा वापर केल्याचा संशय
भाजप कॅबिनेट मंत्र्याच्या पीएचा पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न; वाचवायला आलेल्या पोटच्या मुलालाही बॅटने मारहाण!
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत विराज धोंडेला कांस्यसमर्थ दुसुंगेचाही उल्लेखनीय सहभाग; ‘काकडे’ विद्यालयाचे यश

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. महामार्गावर एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला आपला जीव गमावावा लागला आहे. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
मिरज जवळील महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. याच दरम्यान एक भरधाव कार अत्यंत वेगाने आली आणि थेट उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा या अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचा अतिवेग आणि कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत अधिकाऱ्याची अधिकृत माहिती आणि ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जो पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभे असणारे ट्रक आणि वाहनांचा अतिवेग यामुळे अपघातांचे सत्र थांबायला तयार नाही.
या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि पोलिसांनी सर्व वाहनचालकांना आपल्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि प्रवासादरम्यान विशेष खबरदारी बाळगण्याचे कडक आवाहन केले आहे.

COMMENTS