Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू

शिराळा / प्रतिनिधी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नेर्ले, ता. वाळवा येथे असणार्‍या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिब

अखेर ‘किसन वीर’ कारखान्याच्या गव्हाणीत पडली मोळी
तीन दिवसानंतर अखेर गवा सांगली शहरात दाखल
शिकारीसाठी विनापरवाना प्रवेश; संशयितांकडून घोरपडीवर अत्याचार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी चक्रावले

शिराळा / प्रतिनिधी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नेर्ले, ता. वाळवा येथे असणार्‍या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे.
वाहनांच्या धडकेत रस्ता ओलांडताना अनेक बिबट्यांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. त्यातच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नेर्ले जवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ या मादी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे आहे. याची माहिती कासेगांंव पोलिसांना समजताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी शिराळा वनविभागास माहिती दिली. त्या नंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे, वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. उपवनसंरक्षक विजय माने यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. अंबादास माडकर यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मयत बिबट्याचे दहन करण्यात आले.

COMMENTS