Homeताज्या बातम्या

केज तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा कहर; शेतीचे मोठे नुकसान, वीज पडून एकाचा मृत्यू

बीड : केज तालुक्यातील युसूफ वडगाव महसूल मंडळ आणि परिसरात सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अस

कटकटपुरा-बुंदलपुरा भागातील पाणीटंचाई दूर; नगरसेवक शेख बिलाल यांचा जल्लोषात सत्कार
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; बीड जिल्ह्यात एकाच दिवशी ३ ठिकाणी छापे, १२ लाखांचा गुटखा जप्त
जिल्हा शल्यचिकित्सकांप्रमाणे केज पोलिसांवर कारवाई कधी? उल्हास गिराम यांचा सवाल; बीडमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा

बीड : केज तालुक्यातील युसूफ वडगाव महसूल मंडळ आणि परिसरात सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सोमवारी अचानक आलेल्या हवामान बदलामुळे युसूफ वडगाव महसूल मंडळ परिसरात ताशी ९० ते १२० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची, सोने सांगळी, सुर्डी, थापरी यांसह अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कांदा, ज्वारी, बाजरी, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: या वादळी पावसात सोनीजवळा येथील शेतकरी दिगांबर भीमराव ससाणे यांचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन: नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार संगीताताई ठोंबरे, जिल्हाप्रमुख सचिनभैया मुळूक, तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील, विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS