oplus_1048576 कर्जत : श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रेनिमित्त आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कर्जत तालुक्याचा भूमिपुत्र पैलवान हर्षवर्

कर्जत : श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रेनिमित्त आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कर्जत तालुक्याचा भूमिपुत्र पैलवान हर्षवर्धन पठाडे याने दिल्लीच्या ओंकार पैलवानावर मात करत ‘श्री संत सद्गुरू गोदड महाराज’ किताब पटकावला. विजेत्या हर्षवर्धनला दोन किलो वजनाची चांदीची मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या यात्रेनिमित्त कैलासवासी दिलीप नाना गुलाबराव तोरडमल क्रीडा संकुल येथे ग्रामस्थ, गावकरी व मानकऱ्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मानकरी मेघनाथ कल्याणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनेते कैलासवासी रामभाऊ बाबुराव धांडे यांच्या स्मरणार्थ झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते. हर्षवर्धन पठाडे आणि दिल्लीचा ओंकार यांच्यातील अंतिम लढतीकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले होते. सुरुवातीला ओंकारने हर्षवर्धनवर पकड मिळवली. मात्र हर्षवर्धनने त्यातून सुटका करून घेतल्यानंतर कुस्तीवर वर्चस्व मिळविले. संधी मिळताच त्याने ओंकारला चितपट केले.
स्पर्धेत इचलकरंजीचे श्रीमंत भोसले, हनुमंत पुरी, रोहित मोढळे, शुभम मुसळे, गौतम शिंदे, बाळकृष्ण शेळके, दादा माने, ओंकार कोकरे, धुळाजी इरकर, रोहन गेवडी, भैय्या शेळके, तेजस चौधरी, प्रसाद दंडे, प्रकाश कोळेकर, ऋषी काळे, गणेश शिंदे, गौरव सोताडे, सोहम गव्हाणे यांच्यासह विविध भागांतील मल्लांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी बाप्पासाहेब धांडे, नामदेव राऊत, प्रशांत पाटील, प्रा. शिवाजी धांडे, शहाजी नलवडे, किरण नलवडे, ऋषिकेश धांडे, काका धांडे, शुभम धांडे, नारायण नेटके, प्रा. प्रकाश धांडे, दादासाहेब सोनमाळी, वस्ताद ईश्वर तोरडमल, काकासाहेब शेळके, अजित शेळके, गणेश शेळके, आबा धांडे, बाळासाहेब उर्फ ओंकार पाटील आणि माजी महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, नाना कचरे, नगरसेविका नीता कचरे, सुनील शेलार, अनिल गदादे, दीपक शहाणे, निखिल पाटील, ऍड. धांडे, सुभाष तनपुरे, दत्ता शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS