Homeताज्या बातम्या

प्रा. कुंदा हळबे यांना पीएच.डी.; वयाच्या ७५व्या वर्षीही जिद्दीने मिळवले यश

अहिल्यानगर : प. पू. डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल, विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार

विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल होण्यासाठी शाळेमध्ये रोबोटिक्स लॅबची उभारणी – BD0 सोनल शहा
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड
सहा महिन्यांपासून दहशत माजविणारा बिबट्या जेरबंदऔटेवाडी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

अहिल्यानगर : प. पू. डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल, विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी प्रा. कुंदा हळबे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रदान करण्यात आली.

प्रा. कुंदा हळबे यांनी इंग्लिश मीडियम स्कूल, डी.एड. कॉलेज तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राचार्य म्हणून प्रदीर्घ काळ कार्य केले आहे. सेवानिवृत्तीनंतर जवळपास पंधरा वर्षांनी त्यांनी पीएच.डी. संशोधन कार्यास सुरुवात केली. वयाच्या ७५व्या वर्षी पीएच.डी.चे संशोधन कार्य पूर्ण करणे ही त्यांच्या जिद्दीची, चिकाटीची आणि कठोर परिश्रमाची प्रेरणादायी कहाणी आहे.

प्रा. हळबे यांनी आपल्या पीएच.डी.च्या संशोधन कार्याची सुरुवात डॉ. आश्लेषा भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यानंतर माजी प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे यांच्या मार्गदर्शनाने संशोधन कार्य पुढे नेले. पुढे डॉ. अविनाश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाह सोमनाथ दिघे, सहकार्यवाह तथा माजी प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे, सर्व संस्थाचालक, प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई, सर्व प्राध्यापक, सहकारी तसेच समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

वयाच्या ७५व्या वर्षी पीएच.डी. पदवी संपादन करून प्रा. कुंदा हळबे यांनी विद्यार्थ्यांसह सर्वांसमोर शिक्षणाची अखंड साधना आणि जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

COMMENTS